फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची माहिती [मराठीमध्ये] | Top 5 Free Blogging Platforms in marathi

भारतातील सर्वोत्तम Free Blogging Platform शोधण्यासाठी तुम्ही या पोस्टवर आला आहात. म्हणजे तुम्हाला ब्लॉगिंगबद्दल काहीतरी ज्ञान(माहिती) आहे हे मी समजू शकतो. आणि जर तुम्ही नवीन असाल आणि ब्लॉगिंग म्हणजे काय हेच तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, तुम्ही आमची ब्लॉगिंग म्हणजे नेमकं काय? हि पोस्ट वाचून तुमची हि भीती कमी करू शकता.

Top 5 Free Blogging Platforms in marathi


जर तुम्हाला ब्लॉगिंगबद्दल माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात. या वेबसाइटवर, आम्ही ब्लॉगिंगशी संबंधित नवीन पोस्ट आणतो.

सध्याच्या काळात आपल्याला अनेक विनामूल्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आणि आपण त्यावर आपले खाते (अकॉउंट) तयार करून कुठूनही ब्लॉगिंग करू शकतो. यापैकी, मी तुम्हाला काही ठराविक अगदी विनामूल्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सबद्दल सांगणार आहे .

तुम्ही खाली दिलेल्या free blogging platforms मधून कोणताही एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडून ब्लॉगिंग सुरू करू शकता. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मोबाईल अँप्लिकेशन्स सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजेच आपण या ऍप्लिकेशनचा वापर करून आपल्या मोबाईल (स्मार्टफोन) वरूनही ब्लॉगिंग करू शकतो.

चला तर मग जाणून घेऊयात, त्या फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सबद्दल माहिती मराठीमध्ये 

भारतातील सर्वोत्तम मोफत ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 

मित्रांनो, तुम्ही ब्लॉग वेबसाईट बनवून त्यावर ब्लॉग लिहण्याचा विचार करताय? पण तुम्हांला कोणत्या विषयावर ब्लॉग लिहावा किंवा कोणत्या विषयावर ब्लॉग वेबसाईट बनवावी हे सुचत नसेल? किंवा तुम्हाला फक्त ट्रायलसाठी ब्लॉग वेबसाईट बनवायची असेल तर तुम्ही सुरवातीलाच ब्लॉग वेबसाईट साठी लागणाऱ्या डोमेन, वेबहोस्टिंग किंवा काही इत्तर ब्लॉगिंग टूल्ससाठी पैसे खर्च करत बसण्यात काही अर्थ नाही. त्यावेळी तुम्ही खालील blogging platforms ची मदत घेऊन रुपयाही इन्व्हेस्ट न करता आपली स्वतःची ब्लॉग वेबसाईट बनवू शकतात. 

आपण या पोस्टमध्ये ब्लॉग्गिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या टॉपच्या 5 फ्री ब्लॉगिंग साइट्सबद्दल जाणून घेणार आहोत…

ते फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म खालीलप्रमाणे आहेत  -

1. Blogger.com

2. WordPress.com

3. Tumblr.com

4. Medium.com

5. Linkedin.com

चला तर मग, या सर्व प्लॅटफॉर्मची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

blogger.com

सर्वप्रथम, मी तुम्हाला या सर्व उत्तम ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममधून Blogger.com हा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुचवेन. कारण गुगलने हा फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कोणत्याही विषयावर तुमचा ब्लॉग तयार करू शकता आणि त्यावर पोस्ट लिहू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे हा Blogging Platform वापरण्यासाठी अगदी सोप्पा आहे.

Blogger.com वर तुमचा ब्लॉग तयार करण्यासाठी, तुम्हाला फक्त या साइटवर साइन अप करावे लागेल. साइन अप केल्यानंतर, काही साध्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही त्याच दिवसापासून तुम्ही तुमच्या त्या ब्लॉगवर पोस्ट अपलोड करू शकता. आणि त्या पोस्टची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.

ब्लॉगरवर तुमचा ब्लॉग तयार झाल्यावर yourname.blogspot.com अशा संकेतस्थळाने तुमची ब्लॉगिंग वेबसाइट तयार होईल. आपल्याला ब्लॉगरमध्ये आणखी एक चांगली सुविधा मिळते ती म्हणजे आपल्या ब्लॉग साइटवर कस्टम डोमेन सुद्धा आपण जोडू शकतो.

जर तुम्हाला ब्लॉगिंगबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर ही पोस्ट नक्कीच वाचा – ब्लॉगिंग म्हणजे काय आणि ब्लॉगमधून पैसे कसे कमवायचे. 

wordpress.com

wordpress.com हा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म देखील जवळजवळ blogger.com सारखाच आहे. यामध्येही तुम्हाला अगोदर साइन अप करावे लागेल. wordpress.com हेसुद्धा मोफत ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. जे बहुतेक लोक वापरतात. यात तुम्ही तुमचे खाते तयार करून मोफत ब्लॉगिंग सुरू करू शकता.

वर्डप्रेस या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला Autonomous कंपनीने लाँच केले आहे. वर्डप्रेसची एक Paid आवृत्ती देखील आहे.  जिचे नाव wordpress.org आहे. ब्लॉग्जर्समध्ये wordpress.org खूप लोकप्रिय आहे. यामध्ये आपल्याला अनेक कस्टमायझेशन देखील मिळतात.  आपण आपली ब्लॉग वेबसाईट या टूलद्वारे प्रोफेशनल बनवू शकतो.

Tumblr.com

2007 मध्ये डेव्हिड कार्पने Tumblr.com लाँच केले. सध्या हा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म १८ भाषांमध्ये उपलब्ध आहे. Tumblr.com हे मायक्रोब्लॉगिंगसाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ज्या लोकांना short content लिहायला आवडते. अशा ब्लॉगर्ससाठी हा प्लॅटफॉर्म अगदी योग्य आहे.

यावर आपण फोटो, शॉर्ट व्हिडीओ, कविता, छोट्या कथा यांसारखी छोटी सामग्री प्रकाशित करू शकतो. आपल्याला Tumblr.com वर blogger.com प्रमाणे कस्टम डोमेन नावाची सेटिंग देखील मिळते.

Medium.com

Medium.com हा ब्लॉगर्स समुदाय आहे. परंतु काही ब्लॉगर्स या प्लॅटफॉर्मचा वापर त्यांचा दुय्यम ब्लॉग म्हणून सुद्धा करतात.

नवीन ब्लॉगर्ससाठी Medium.com हा प्लॅटफॉर्म अतिशय वापरकर्ता अनुकूल(User Friendly) आहे. यामध्ये तुम्हाला जास्त कस्टमायझेशन करण्याची गरज नाही. या प्लॅटफॉर्मवर, तुम्ही साइन अप करून आणि ब्लॉग पोस्ट लिहिणे सुरू करू शकता.

हा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे काम करतो.

Linkedin.com

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर अनेकांनी तुम्हाला Linkedin वर तुमची प्रोफाइल तयार करण्यासाठी Linkedin प्लॅटफॉर्मबद्दल सांगितले असेल. तिथून तुम्हाला नोकरीच्या अचूक अपडेट्स मिळतील. पण मी तुमच्यासाठी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, Linkedin हे जॉब पोर्टल नाही.

Linkedin हे सर्व व्यवसायातील लोकांना एकत्र आणणारा एक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित लोकांशी संपर्क साधू शकतात.  चला तर मग आपल्या blogging च्या विषयाकडे येऊ.

तुम्ही Linkedin या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर फॅशन, स्वयंपाक, जीवनशैली यासारखे ब्लॉग लिहू शकत नाही कारण सर्व व्यावसायिक या प्लॅटफॉर्मवर राहतात. परंतु जर तुम्हाला मार्केटिंग, फायनान्स, बिझनेस, इन्व्हेस्टमेंट यावर ब्लॉग लिहायचा असेल तर तुमच्यासाठी हे योग्य Linkedin हा प्लॅटफॉर्म अगदी बरोबर आहे.

मला आशा आहे की तुम्हाला आमची Top 5 Free Blogging Platforms पोस्ट आवडली असेल. मित्रांनो जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत जरूर शेअर करा.

 तुम्ही ही पोस्ट पण जरूर वाचा-

वाचा: वेब होस्टिंग म्हणजे काय? , वेब होस्टिंग काय आहे आणि ते का महत्वाचे आहे | ब्लॉग गाइड 2022 तुम्हाला ब्लॉगिंगबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास येथे क्लिक करा – ब्लॉगिंग शिकायचे आहे..

संगणक शिकायचा असेल तर इथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form